काव्यभीमायन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मराठीतील ही पहिली महाकविता. 1975 साली ती प्रकाशित झाली. आंबेडकर नावाच्या सूर्यांच्या महासूर्याचे हे काव्यशिल्प म्हणजे क्रांतीचे ऊर्जायनच होय. बाबासाहेबांवरील अलीकडच्या काही स्फूट कवितांसह ती आता काव्यभीमायन या नावाने प्रकाशित झाली.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +4 (from 4 votes)

उत्थानगुंफा

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळालेला बहुचर्चित कवितासंग्रह. या कवितासंग्रहाने आंबेडकरवादी आणि मराठी कवितेला इहवादी तत्त्वज्ञानाचा रेखीव पाया दिला. उत्थानगुंफा म्हणजे विद्रोहाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार. मराठीत जडवादी क्रांतीचे धगधगते क्षितिज उघडून देणारा कवितासंग्रह. मुंबई, मराठवाडा, अमरावती, धारवाड, नागपूर अशा महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वच विद्यापीठांच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट. उत्थानगुंफेवरील समीक्षालेखांचा ‘उत्थानगुंफा: आकलनाचे आलेख’ हा ग्रंथ पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केला.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.3/5 (6 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 3 votes)
Powered By Indic IME