स्वाद आणि चिकित्सा

बुद्धिवादी समीक्षासूत्रे प्रमाण मानून लिहिलेल्या समीक्षालेखांचा संग्रह. दलित साहित्याला प्रारंभकाळातच आंबेडकरवादाची भक्कम बैठक देणारे पुस्तक.

Contents :

1. बौद्ध धम्म आणि महानुभाव पंथ
2. आदिविद्रोही कवी केशवसुत
3. अण्णा भाऊ साठे: एक चिंतन
4. प्राचीन मराठी साहित्याच्या समृद्धीत श्रीचक्रधरांचा वाटा
5 ज्वाला आणि फुले
6. पुन्हा एकदा मृणालिनीचे लावण्य
7. अंधेरे बंद कमरे: मानवी आकांताचे नवे पोत
8. बालकवींची कविता
9. अनियतकालिकांची वाङ्मयीन व सांस्कृतिक फलश्रुती
10. नामदेवांची कविता
11. वामन निंबाळकरांच्या कवितेच्या निमित्ताने
12. दलित रंगभूमी
13. दलित कवितेचे निराळेपण

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

दलित साहित्य: सिद्धान्त आणि स्वरूप

1970च्या सुमारास दलित साहित्याला रेखीव असा आंबेडकरवादाचा पाया देणारे मराठीतले हे पहिले पुस्तक. हे पुस्तक चिद्वाद पूर्णतः उद्ध्वस्त करते आणि जडवादाला अभिप्रेत इहजीवनातील स्वयंभू समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि समान मानवी अधिकारांचा उद्घोष करते.

Contents :

1. दलित साहित्य: सिद्धान्त आणि स्वरूप
2. शोषितांच्या उत्थानाचे चरित्र
3. दलित साहित्याची प्रेरणा
4. दलित साहित्य: सामाजिक बांधिलकीचा प्रश्न
5 दलित साहित्य आणि पुरोगामित्व
6. कलावाद आणि कलावादी
7. दलित साहित्याची पार्श्वभूमी
8. प्राचीन मराठी संत आणि वर्णव्यवस्था
9. अण्णाभाऊ साठ्यांच्या जीवनजाणिवा
10. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.6/5 (5 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: -1 (from 1 vote)

स्वप्नसंहिता

महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, इचलकरंजीचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे मौलिक पुरस्कार मिळाले. या कवितासंग्रहात कवीच्या मनातली विलक्षण तडफड साकार होते. कविता विसाव्या शतकाची ही प्रदीर्घ कविता या कवितासंग्रहात आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.3/5 (4 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +4 (from 4 votes)

अग्नीचा आदिबंध

सामान्य माणसांच्या दुःखांनी अस्वस्थ असलेली कविता. कवीच्या काळजातील ज्वालामुखीचे आणि प्रज्ञानपौर्णिमेचेही काव्यमय प्रगल्भ रूप म्हणजे अग्नीचा आदिबंध.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

प्रतीक्षायन

प्रतीक्षायनमध्ये वेगवेगळ्या शीर्षकांची एक महाकविता तयार होते. प्रेम या अत्युत्कट भावनेच्या मूलभूततेचा शोध असे या मालिकाकाव्याचे रूप आहे. प्रेम म्हणजे स्त्री-पुरावांच्या जीवनातील भावकाव्यच होय. या तरल, मोहक आणि दाहक लालित्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन! स्त्री-पुरुषांची भावविश्वे ज्याची कायम प्रतीक्षा करीत असतात. अशा संपूर्ण प्रेमाचे आभासचित्र म्हणजे प्रतीक्षायन! जीवनात प्रेम या नावाने एक अटळ आणि मूलभूत महासत्य वावरते, हे महासत्य समाजवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन!

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +4 (from 4 votes)
Powered By Indic IME