महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, इचलकरंजीचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे मौलिक पुरस्कार मिळाले. या कवितासंग्रहात कवीच्या मनातली विलक्षण तडफड साकार होते. कविता विसाव्या शतकाची ही प्रदीर्घ कविता या कवितासंग्रहात आहे.
सामान्य माणसांच्या दुःखांनी अस्वस्थ असलेली कविता. कवीच्या काळजातील ज्वालामुखीचे आणि प्रज्ञानपौर्णिमेचेही काव्यमय प्रगल्भ रूप म्हणजे अग्नीचा आदिबंध.
प्रतीक्षायनमध्ये वेगवेगळ्या शीर्षकांची एक महाकविता तयार होते. प्रेम या अत्युत्कट भावनेच्या मूलभूततेचा शोध असे या मालिकाकाव्याचे रूप आहे. प्रेम म्हणजे स्त्री-पुरावांच्या जीवनातील भावकाव्यच होय. या तरल, मोहक आणि दाहक लालित्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन! स्त्री-पुरुषांची भावविश्वे ज्याची कायम प्रतीक्षा करीत असतात. अशा संपूर्ण प्रेमाचे आभासचित्र म्हणजे प्रतीक्षायन! जीवनात प्रेम या नावाने एक अटळ आणि मूलभूत महासत्य वावरते, हे महासत्य समाजवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन!
नवकवितेनंतरची मराठीतील अनन्य महत्त्वाची कविता. ज्वलंत विद्रोह आणि प्रज्ञान यांचे एक आगळेवेगळे प्रशांत रूप. इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मुंबई अशा अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा कविता- संग्रह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.
आंबेडकरवादी प्रेमकवितेचे अपूर्व आणि अनोखे लावण्य आणि समाजक्रांतीसाठी तडफडणाऱ्या अनुभवांचे अनोखे सौंदर्य या कवितासंग्रहात आहे.