हा उत्कृष्ट ललित लेखांचा संग्रह. डॉ. मनोहरांनी लिहिलेले हे मृत्यूलेख वाचकांना अंतर्मुखतेच्या शिखरावर घेऊन जातील. डॉ. म. ना. वानखडे, प्रा. गं. बा. सरदार, पु. ल. देशपांडे, वा. ल. कुळकर्णी, वामन कर्डक अशा अनेक महान कर्तृत्वासंबंधी लिहिलेले हे अप्र्रतिम लेख आहेत. या पुस्तकातील मृत्यूचिंतन जीवनाचा सतत जबाबदारीने आणि गांभीर्याने पुनर्विचार करायला लावील.
Contents :
1. डॉ. म. ना. वारखडे: विद्रोहाचे तत्त्वज्ञानसौंदर्य 2. प्रा. गं. बा. सरदार: प्रबोधनाचा दीपस्तंभ 3. वा. ल. कुळकर्णी: माझे पितृमनस्क प्राध्यापक 4. पु. ल. देशपांडे: मोठ्या मनाचे एक बुद्धिवादी आभाळ 5. वि. भि. कोलते: एक आदरणीय वाङ्मयीन पराक्रम 6. बाबा दळवी: परिवर्तनाच्या चळवळीतील निर्मळ उजेडाचे झाड 7. शरच्चंद्र मुक्तिबोध: अमानुषतेच्या सौंदर्यसिद्धान्तावर हल्ला 8. प्र. श्री. नेरुरकर: माणुसकीच्या उजेडाची कार्यशाळा 9. कुसुमाग्रज: मराठी साहित्यातील युगनायक 10. वामन चोरघडे: नवकथेची लोभस पहाट 11. सुखराम हिवराळे: मित्रत्वाची अखंड पौर्णिमा 12. सुरेश भट: मृत्युशी चर्चा करीत जगलेला कवी 13. डॉ. भालचंद्र फडके: एक सुंदर विद्रोही संस्कृती 14. वामनदादा कर्डक: तुफानातील दिव्यांचे झाड