धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना

लक्ष्मण माने 2006च्या आक्टोबरमध्ये बुद्धधम्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने डॉ. यशवंत मनोहरांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. या वीस पत्रांमधून भोवतीच्या वैचारिक अराजकाची, खाचाखळग्यांची, चकव्यांची आणि धोक्यांची अत्यंत गंभीर, अत्यंत जबाबदार चर्चा त्यांनी केली. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धाकडेच लक्ष्मण मानेंनी जावे. चकव्यांच्या मोहात पडू नये. यासाठी सावधगिरीचे इशारे या पत्रांमधून डॉ. मनोहरांनी दिले आहेत. त्याला ऐतिहासिक मूल्य आहे. ही पत्रे थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपाशी आणि आंबेडकरांच्या बुद्धापाशी वाचकांना घेऊन जातील.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)
धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना, 5.0 out of 5 based on 2 ratings