मनोहरांच्या साहित्यावरील पीएच.डी.प्राप्त प्रबंध
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मनोहरांच्या साहित्यावर आजवर पुढील संशोधकांनी पीएच.डी.साठी प्रबंध लिहिले. शिवाय अनेक अभ्यासक संशोधन करीत आहेत.वेगवेगळ्या विद्यापीठात एम्.फिलसाठीही त्यांच्या साहित्यावर अनेक प्रबंधिका लिहिल्या गेल्या आहेत.
1. डॉ. बाबुराव भिवाजी खंदारे
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहर यांच्या कवितेतील मूल्यविचार
विद्यापीठ: स्वामी रामानदंतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: जुलै 2008
2. डॉ. स्मिता शेंडे
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहरांची कविता
विद्यापीठ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: 2008
3. डॉ. अशोक डोळस
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहरांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास
विद्यापीठ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: एप्रिल 2008
4. डॉ. धनंजय वाघमारे
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहरांची समीक्षा: एक अभ्यास
विद्यापीठ: पुणे विद्यापीठ, पुणे
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: 2011
5. डॉ. माधव चांदराव हैबतकर
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहर यांच्या साहित्याचा अभ्यास
विद्यापीठ: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: 2011
6. डॉ. अनिल नितनवरे
प्रबंधाचा विषय: यशवंत मनोहर यांचे ललित वाङ्मय
विद्यापीठ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
पीएच.डी. मिळाल्याचे वर्ष: मार्च 2012
वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश:
अकराव्या-बाराव्या इयत्तेपासून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या बी.ए.च्या सर्वच वर्षांच्या अभ्यासक्रमात आणि एम्.फिल, नेट-सेटच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे.