यशोधरा, सावित्री, रमाई

या देशातील सर्वच बहिष्कृतांच्या सांस्कृतिक महामाता असलेल्या यशोधरा, सावित्री आणि रमाई यांच्यावरच्या अत्यंत सुंदर अशा कादंबऱ्या एकत्रित रूपात या पुस्तकात आलेल्या आहेत. वाचकाला एका वेगवेगळ्या  उन्नत आणि प्रकाशमान भावविश्वात घेऊन जाणाऱ्या या कादंबऱ्या आंबेडकरवादी साहित्याचे भूषण ठरलेल्या आहेत. अल्पाक्षररमणीयत्वाचा इतका उत्कट प्रत्यय इतरत्र क्वचितच पहायला मिळेल.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

मी यशोधरा!

महामाता यशोधरेवरची ही स्वतंत्र कादंबरी. स्वतः यशोधराच आपले जीवनचरित्र इथे सांगते. ही पात्रमुखी कादंबरी आहे. यशोधरेच्या जाणिवेचा आणि नेणिवेचाही इतका सुंदर आविष्कार मराठीत आणि भारतीय भाषांमध्येही दुसरा नाही. यशवंत मनोहरांच्याच प्रतिभेला शक्य व्हावे असे हे अप्रतिम कादंबरीशिल्प आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

मी सावित्री

सावित्रीमाई फुल्यांवरची ही स्वतंत्र कादंबरी. सावित्रीमाईचे जीवन म्हणजे संघर्ष. स्वतः सावित्रीमाईच स्वतःचे जीवन चरित्र सांगते. सावित्रीमाईंच्या जीवनावरचे एवढे सुंदर कादंबरीकाव्य दुसरे नाही. सावित्रीमाईंचे जगणे स्वतःसाठी नव्हतेच. हे जगणेही लोकांसाठी होते आणि मरणेही लोकांसाठीच होते. महामाता सावित्रीमाईंना केलेले हे कादंबरीमय अभिवादन वाचकांपुढे माणुसकीचे एक नवे महाकाव्य अंथरील.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.7/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

रमाई

‘रमाई’ ही कादंबरी म्हणजे यशवंत मनोहरांमधल्या कवीने महामाता रमाईला अर्पण केलेली आदरांजली हेाय. ‘रमाई’ या कादंबरीने इतिहास घडविला. महाराष्ट्रातील वाचकांनी ही कादंबरी पुनःपुन्हा वाचली. महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या गावांमधून, अनेक विहारांमधून रमाईचे समूहांपुढे वाचन झाले. रमाई हे कारुण्याचे अजोड शिल्प आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.4/5 (28 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +5 (from 9 votes)

संवादाचा आदिबंध

समाज आणि साहित्यसमीक्षा, युगसाक्षी साहित्य आणि साहित्य आणि समाजक्रांती या पुस्तकांमधून मनोहरांच्या महत्त्वाच्या चौदा मुलाखती प्रकाशित झाल्या आहेत. ‘संवादाचा आदिबंध’ या पुस्तकात पंधरा मुलाखती प्रकाशित होत आहेत. मनोहरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची निर्मिती आणि त्यांची जीवनविषयक आणि वाङ्मयविषयक भूमिका समजावून घेण्यासाठी या सर्वच मुलाखती मार्गदर्शकाचे काम करतील.

Contents :

प्रस्तावना: प्रा. प्रकाश राठोड
1. जगातल्या सर्व भाषांमधला सर्वात सुंदर शब्द माणूसच
मुलाखतकार: प्रमोद वाळके: ‘युगंधर’ नागपूर
2. आपला देशच आज गहाण
मुलाखतकार: विजय चोरमारे, सकाळ 16 जाने. 1994, कोल्हापूर
3. जीवनाची मुलाखत घेणारे साहित्य
मुलाखतकार: डॉ. अनिल नितनवरे, नागपूर
4. श्रेष्ठ साहित्याचे मर्म
मुलाखतकार: डॉ. कोमल वि. ठाकरे, नागपूर
5. कादंबऱ्यांच्या  निर्मितीसंबंधी
मुलाखतकार: मनीषा डोंगरे, नाशिक
6. संविधानसंमेलन: नवजीवनाच्या निर्माणचे संमेलन
मुलाखतकार: अरुण जावळे, सातारा
7. विशाल हिंदू संमेलन, हिंदू व्होट बँक
मुलाखतकार: श्याम पांढरीपांडे, नागपूर
8. माणुसकीच्या असीमतेचे साहित्य
मुलाखतकार: प्राची दयालराव देशपांडे, नागपूर
9. अस्वस्थता आणि साहित्य
मुलाखतकार: डॉ. विशाखा कांबळे
10. सामाजिक कवितेच्या संदर्भात
मुलाखतकार: डॉ. अविनाश सांगोलेकर, पुणे
11. भटक्या-विमुक्तांचे प्रश्न
मुलाखतकार: प्रा. प्रकाश राठोड
12. मुस्लिम साहित्य आणि समाज
मुलाखतकार: डॉ. अक्रम पठाण
13. आंबेडकरी नाट्यचळवळ
मुलाखतकार: केवल जीवनतारे, नागपूर
14. सफाईकर्मियों को दलितत्व के खिलाफ युद्ध छेडना होगा
मुलाखतकार: सुंदरलाल टाकभौरे, नागपूर
15. मैं जमीनी संघर्षे से जुडा हुआ हूँ
मुलाखतकार: बजरंग बिहारी तिवारी, नई दिल्ली

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.0/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME